आज पंढरपूर- मंगळवेढा पोट-निवडणुकीसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रावादीचे उमेदवार भालचंद्र भालके यांची प्रचार सभा घेतली. मात्र या प्रचारसभेवर कोरोना निर्बंधांच्या पायमल्लीचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
राज्यभरात सध्या रुग्णवाढ भयावह वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात राजकीय सभांना देखील परवानगी नाही. असे असताना खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवून पंढरपूरमध्ये राजकीय सभा घेतली कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबरोबरच सामान्य नागरीकांवर कोरोनाविषयक नियम तोडल्यास कारवाई केली जाते, त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त
वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना सोशल डिस्टसिंग पाळा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा असे सांगत असतात, मात्र त्यांचे उपमुख्यमंत्री हे जुमानताना दिसले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील लोकांना, सरकारला सहाय्य करण्याचा त्याप्रमाणे या काळात कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. अजित पवारांनी स्वतःच या आवाहनाला देखील हरताळ फासल्याचे दिसत आहे.