अजित पवारांनी शरद पवारांची घेतली भेट; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिले संकेत

अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतेही उपस्थित

अजित पवारांनी शरद पवारांची घेतली भेट; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिले संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्त अनेक दिग्गज मंडळी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार हे शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित आहेत होते.

अजित पवारांसह प्रमुख नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सहा जनपथवर पोहोचले आहेत. या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये काही बदल होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडत भाजपा आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. ४० आमदारांनी यावेळी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली होती.

शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, “आज साहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळे सगळे शुभेच्छा देत असतात आम्हीही शुभेच्छा देण्यासाठी आलो. साहेबांचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत नेहमी होते ती चर्चा झाली. चहापाणी झाले, परभणी हिंचासार, राज्यसभा आणि महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ यांवर आमच्यात चर्चा झाली. राजकारणात फक्त टीकाच करायची नसते. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं ते शिकवले आहे. आम्ही त्यानुसार राजकारण करण्याच्या प्रयत्न करत आहोत, असे अजित पवार म्हणाले. १६ तारखेला हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून त्याआधी १४ तारखेला मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो,” असे अजित पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार; आयईडी स्फोटात दोन जवान जखमी

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का असा सवाल विचारला जात आहे. तर, अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र ही कौटुंबिक भेट असून केवळ शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली भेट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version