“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”

राज्याला दोन उपमुख्यमंत्री; अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री

“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीचं जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार, रविवार, २ जुलै हा दिवस वादळी ठरला. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या असून राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानुसार आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तर अजित पवार उपमुख्यमंत्री असतील. तसेच देवेंद्र फडणवीस हे ही उपमुख्यमंत्री असणार आहेत.

शरद पवारांच्या काही मतांशी सहमत नसल्याचे अजित पवारांच्या वागणुकीमधून काही दिवसांपासून दिसून येत होते. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं असून अजित पवार हे राष्ट्रवादीमधील आमदारांच्या आणि खासदारांच्या गटासह सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, हे सर्व मान्य नसल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. अजित पवारांसह  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

हे ही वाचा:

पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

फ्रान्समध्ये आंदोलकांकडून ऍपल, नायकीच्या दुकानांची लूट

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

तसेच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. त्यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Exit mobile version