“अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे अजित पवार खोटं बोलत आहेत”

नाना पटोलेंची अजित पवारांवर टीका

“अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे अजित पवार खोटं बोलत आहेत”

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवार, १२ मे रोजी केलं होतं. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांनी टीका केली आहे.

“अजित पवार आता खोटं बोलत असून मी तेव्हा अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटलो. आत्ताच राजीनामा देऊ नका, असं ते म्हणाले होते. परंतु, त्यांना राजीनाम्याबद्दल माहिती होतं. ते आता खोटं बोलत आहेत. मी अध्यक्ष नव्हतो तर उपाध्यक्ष त्यांचाच होता. त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. एक वर्ष नवीन अध्यक्ष करु शकले नाही, हा आमचा दोष आहे. पण, उपाध्यक्षांनी माझे अधिकार वापरायला पाहिजे होते. परंतु, त्यांनी ते वापरले नाहीत,” अशी टीका नाना पटोले यांनी अजित पवारांवर केली आहे.

हेही वाचा :

३० हजार पगारी इंजिनीअरचा लाखोंचा थाट!

“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”

“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”

वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!

“महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्ष यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरच त्यांना सांगितलं. एकतर तो द्यायला नको होता. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्याक्षांची निवडणूक लावून तो विषय संपवला पाहिजे होता. तो विषय तातडीने मार्गी लागला असता तर विधानसभेचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केले.

Exit mobile version