आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रिपदाची शक्यता!

अजित पवार गटाला १ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपद मिळू शकते

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रिपदाची शक्यता!

घटस्थापनेनंतर राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याची माहिती आहे.

मागील राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात अजित पवारांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसऱ्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत.

हे ही वाचा:

हमास दहशतवाद्यांच्याच्या नौदल कमांडरला इस्त्रायल सैन्याने घेतले ताब्यात

तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!

जर श्री रामजन्मभूमी परत घेता आली तर आम्ही ‘सिंधूही’ परत आणू!

दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

अचानक पणे सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीमुळे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजीचे चित्र पाहायला मिळाले होते.त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेनंतर देखील रखडल्यास अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एक कॅबिनेट पद आणि तीन राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version