बारामती मधून अजित पवार, येवल्यातून भुजबळ, परळीतून मुंडे तर कागलमधून हसन मुश्रीफ!

अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बारामती मधून अजित पवार, येवल्यातून भुजबळ, परळीतून मुंडे तर कागलमधून हसन मुश्रीफ!

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण ३८ उमेदवारांची नावे आहेत. बारामती मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. परळीतून मंत्री धनंजय मुंडे तर मंत्री हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी

बारामती- अजित पवार

येवला-छगन भुजबळ

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी-नरहरी झिरवाळ

अहेरी-धर्मराव बाबा आत्राम

श्रीवर्धन-अदिती तटकरे

अंमळनेर-अनिल भाईदास पाटील

उदगीर-संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव-राजकुमार बडोले

माजलगाव-प्रकाश दादा सोळंके

वाई – मकरंद पाटील

सिन्नर – माणिकराव कोकाटे

खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर – संग्राम जगताप

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

शहापूर-दौलत दरोडा

पिंपरी- अण्णा बनसोडे

कळवण- नितीन पवार

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

बसमत – राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

मावळ – सुनील शेळके

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज अहिरे

चंदगड- राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर- राजू कारेमोरे

पुसद- इंद्रनील नाईक

अमरावती- सुलभा खोडके

नवापूर- भरत गावित

पाथरी- निर्मला विटेकर

मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

हे ही वाचा : 

पुस्तक विकण्यासाठी आपली इज्जत विकली; बबिता फोगट यांची टीका

‘बटेंगे तो कटेंगे’ आशयाचे मुंबईत लागले पोस्टर्स

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : हत्येपूर्वी स्नॅपचॅटचा वापर झाला

हसीना अजूनही पंतप्रधान आहेत का?, राष्ट्रपती शहाबुद्दीन म्हणाले- माझ्याकडे त्यांचा राजीनामा नाही!

Exit mobile version