शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात पावले उचलल्यानंतर आता अजित पवार गटही कार्यरत झाला आहे. अजित पवारांच्या गटाकडून शरद पवारांकडील आमदार अपात्र असल्याची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात करण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या गटातील १० आमदारांविरोधात ही याचिका करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या दोन आमदारांवरही वेगळी कारवाईची मागणी आहे. पक्षविरोधी कृती केल्याबद्दल ही कारवाई करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे.
याचदरम्यान शरद पवार गटाकडील एक आमदार आणि एक खासदार अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे १० आमदार आणि तीन खासदार शिल्लक राहतील असे चित्र दिसते.
शरद पवार गटाच्या वतीने १५ दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनीही हे पाऊल उचलले आहे. यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका करताना म्हटले की, हा आमच्या गटातील आमदारांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे. आमदारांची विकासकामे अडवून त्यांच्याकडून सह्या घेतल्या जात आहेत. काम सुरू करण्यासाठी पाठिंबा देण्यास सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !
सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !
तेलंगणा पोलिसांचा नक्षल ‘ विजय ‘
कॅनडाला अमेरिका, ब्रिटनचा पाठिंबा नाही!
यावर बोलताना सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर शरसंधान केले. रोहित पवार यांना अकाली प्रौढत्व आल्याचे ते म्हणाले.
शरद पवार यांच्या गटात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुमन पाटील, अशोक पवार, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर हे आमदारा आहेत. तर तटस्थांमध्ये नवाब मलिक आहेत. खासदारांमध्ये वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, फौजिया खान, श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे.
अजित पवार यांनी शरद पवारांचे नेतृत्व झुगारल्यानंतर स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थेट सत्तेत सहभाग मिळविला. आता त्यांच्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचे बोलले जाते. निवडणूक आयोगाकडेही अजित पवार गटाने मीच या पक्षाचा अध्यक्ष असल्याचे म्हणणे मांडले आहे तर शरद पवार गटाने हा पक्ष आपला असून चिन्हही आपल्याकडेच असल्याचा दावा केला आहे.