अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड

अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड

राज्यात शिवसेना आणि भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, ४ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र विश्वास दर्शक ठराव मतदानानंतर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘मी आलो, पण यांना घेऊन आलो!’ फडणवीस यांनी लगावला टोला

लहानातल्या लहान माणसाच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे!

संतोष बांगर एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेत रवाना

शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली

“अजित दादा म्हणजे अजिंक्य अशी पावरफुल शक्ती. सरकार चुकत असेल तर त्याला ती चूक दाखवून देण्याच काम विरोधीपक्ष नेत्याला करावं लागतं. अजित दादांची एक घाव दोन तुकडे अशी पद्धत आहे, ही चांगली पद्धत आहे. नाहीतर सरकारी काम आणि सहा महिने थांब असं काही तुमच्याकडे नसतं. महाविकास आघाडी सरकाच्या काळात सर्वात जास्तवेळ मंत्रालयात बसलेला व्यक्ती म्हणजे अजित पवार. अजित दादांनी आजपर्यंत आपल्या खात्याचा कारभार चांगला केला आहे. या सभागृहात सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधीपक्षाचा देखील मान ठेवावा लागतो तो आमच्याकडून ठेवला जाईल. विरोधीपक्ष नेते हा सत्तारुपी हत्तीवर अंकुश ठेवणारा माहूत असतो,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version