राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेले अजित पवार हे विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजभवन येथे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील अजित पवार यांच्या सोबतचे आमदार आणि नेते जमले आहेत.
अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे २५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार हे आज अनुक्रमे मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसेच नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती.
हे ही वाचा:
पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला
फ्रान्समध्ये आंदोलकांकडून ऍपल, नायकीच्या दुकानांची लूट
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या असून ६ जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र, त्यानंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राजभवनात छगन भुजबळ, अमोल मिटकरी, दिलीप वळसे पाटील आदी आमदार उपस्थित आहेत.