27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारणअजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच...

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

बांगलादेशात ईव्हीएम रद्द केल्याचे राऊत यांनी केले होते स्वागत

Google News Follow

Related

अजित पवार हे विरोधी पक्ष नेते असले तरी ते महाविकास आघाडीलाच कधी कधी अडचणीत आणतात किंवा त्यांनाच तोंडघशी पाडतात. बांगलादेशात ईव्हीएमऐवजी बॅलट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावर खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले होते. पण अजित पवार यांनी त्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फिरविले.

अजित पवार हे शुक्रवारी रात्रीपासून गायब असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत कोणतीही व्यवस्थित माहिती नसताना अशा बातम्या का दिल्या जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ईव्हीएमच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी राऊत यांच्याशी आपण सहमत नसल्याचे म्हटले.

संजय राऊत यांनी मुखपत्र सामनामध्ये ईव्हीएमबद्दल बांगलादेशने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण अजित पवार यांनी विविध राज्यात विविध पक्षांनी जिंकलेल्या निवडणुकांची उदाहरणे सांगत राऊत यांच्या विधानातील हवाच काढून टाकली.

हे ही वाचा:

मायानगरीच्या मयासुरांवर कारवाई कधी?

भारत-श्रीलंका तस्करी प्रकरणी चेन्नईत एनआयएची छापेमारी,सोने , ८०लाखांची रोकड जप्त

शरद पवार म्हणाले….मोदी-अदानी मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती उपयोगाची नाही?

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

ईव्हीएमबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. जर तसे असते तर पंजाब, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आले नसते. तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्याकडे लोकांनी सत्ता सोपविली नसती. राजस्थानात काँग्रेसला सत्तेत येता आले नसते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या नसत्या. पराभव झाला की ईव्हीएमवर दोष आणि जिंकल्यावर सगळे काही आलबेल हे चालायचे नाही.

संजय राऊत यांनी अग्रलेखातून ईव्हीएमबाबत बांगलादेशने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले होते. शिवाय, शरद पवारांकडे १५ दिवसांपूर्वी विरोधकांची बैठक झाल्याचेही ते म्हणाले. त्या बैठकीत ईव्हीएमच्या माध्यमातून कसे घोटाळे होतात यावर चर्चा झाल्याचे राऊत म्हणाले. भाजपाच्या आणि मोदींच्या यशाचे रहस्य ईव्हीएममध्ये दडले असल्याचीही चर्चा या बैठकीत झाली. बांगलादेशात ईव्हीएम रद्द केले गेले. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे. मुख्य म्हणजे तिथे विरोधी पक्षांनी मागणी केल्यानुसार इव्हीएम रद्द करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आल्यापासून ईव्हीएमवर सातत्याने विरोधकांनी टीका केली आहे. ईव्हीएममुळे भारतीय जनता पक्षाला विजय मिळतो असा दावा करण्यात आला आहे. पण विविध राज्यात याच विरोधकांना ईव्हीएमद्वारे यश मिळाल्यानंतर मात्र त्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतलेला नाही. आता बांगलादेशात ईव्हीएम रद्द करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा