अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले

अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तेरा साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले, असा घणाघाती आरोप भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. शरद पवार यांचं अख्खं कुटुंब सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आलं आहे. मात्र, त्यांना या पंढरपूर-मंगळवेढाच्या निवडणुकीशी काहीही देणघेणं नाही. त्यांचा डोळा हा विठ्ठल कारखान्यावर आहे. हा कारखाना त्यांना घशात घालायचा आहे. काही दिवसांपूर्वीच करारपत्र करुन आदिनाथ कारखाना पवारांच्या नातवाने घशात घातला, अशी टीका त्यांनी केली.

ते बुधवारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पवार कुटुंबीयांचा समाचार घेतला. राज्यातील शेतकरी आणि सभासदांच्या पैशांवर हे साखर कारखाने चालतात. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र मोडून या कारखान्यांमध्ये पैसे भरले आहेत. जवळपास तीनशे ते चारशे कोटींची संपत्ती असणारे हे कारखाने अजित पवार यांनी पाच, सहा, दहा कोटी, अशा कवडीमोल दराने विकत घेतले आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी

लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील. ही केवळ एका मतदारसंघाची निवडणूक नाही तर संपूर्ण राज्याच्या जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात. पंढपुरातील ३५ गावांच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने पैसे दिले नाही तर आम्ही केंद्रातून पैसे आणू, असे आश्वासनही गोपीचंद पडळकर यांनी दिले.

Exit mobile version