पंढरपूर मधील कोरोना प्रसाराला नागरिक जबाबदार

पंढरपूर मधील कोरोना प्रसाराला नागरिक जबाबदार

काही दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये प्रचार करत मतांचा जोगवा मागणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मुक्ताफळे उढळली. पंढरपूर मधे वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला तेथिल नागरिक जबाबदार आहेत असे म्हणत त्यांनी जबाबदारी झटकली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हेच अजित पवार पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत लोकांमधे फिरत होते.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली असून रोज लाखो लोक कोविडच्या कचाट्यात येत आहेत. या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच पंढरपूरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची विधानसभेचे जागा रिक्त झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहित अनेक मंत्री,नेते हे पंढरपुरात तळ ठोकून होते. पंढरपूरात लोकांची गर्दी जमवून प्रचारसभा घेण्यात आल्या. यातही राष्ट्रवादीकडून अजित पवार आघाडीवर होते.

हे ही वाचा:

धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

फडणवीसांच्या प्रयत्नाने नागपूरला मिळाला ऑक्सिजन

महाराष्ट्रात कोविड परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर जेव्हा कडक निर्बंध लावण्यात आले तेव्हादेखील निवडणूक प्रचार डोळ्यासमोर ठेवून सरकारने पंढरपूरला त्या निर्बंधांमधून वगळले होते. पण निवडणुकिचे मतदान झाल्यावर मात्र अजित पवार हात झटकताना दिसत आहेत. पंढरपूरमध्ये रुग्णसंख्या वाढल्यावर जनतेवर त्याचे खापर फोडत आहेत. त्यांच्या या विधानावर पंढरपूरच्या लोकांमध्ये चीड असून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Exit mobile version