एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात राजकीय वातावरण अधिक वेगाने सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्ट मतं दिले आहे. शिवसेनेचे आमदार जे गेले आहेत त्यावर मी काही सल्ला देणार नाही. ते आमच्या पार्टीचे नाहीत. मात्र तरीही महाविकास आघाडीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पूर्ण पाठींबा देत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र आहे आणि पुढेही एकत्र राहणार, असे अजित पवार म्हणाले आहेत. मात्र, माध्यमांनी जेव्हा बंडखोर आमदारांबद्दल विचारणा केली तेव्हा अजित पवार म्हणाले, माझ्या पार्टीचे आमदार गेलेले नाहीत, त्यामुळे मी सल्ला देणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार असते तर मी सल्ला दिला असता असंही अजित पवार म्हणाले. माझा संबंध महाराष्ट्रापुरता आहे असं म्हणत अजित पवार यांनी गुवाहाटी येथे घडणाऱ्या घडामोडींमधून स्वतःला दूर केलं.
संध्याकाळी शरद पवार प्रफुल्ल पटेलयांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे जाणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितलं. शरद पवार आमचं दैवत आहे. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची आमची लायकी नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहणं राष्ट्रवादीचं काम असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘राज्यातील घटनांशी भाजपाचा संबध नाही’
‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर कारवाईची मागणी
४८ तासांत राज्य सरकारचे १६० शासनआदेश; दरेकरांनी राज्यपालांना लिहिले पत्र
दरम्यान,कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. एकनाथ शिंदेना भाजपचा पाठिंबा आहे का? या प्रश्नावर अजित पवार यांनी यामागे भाजपाचा एखादा मोठा नेता अद्याप तरी दिसून येत नसल्याचे विधान काल केले होते.