भाजपाच्या १२ आमदारांच्या एका वर्षासाठी केलेल्या निलंबनाविरोधात अजित पवार

भाजपाच्या १२ आमदारांच्या एका वर्षासाठी केलेल्या निलंबनाविरोधात अजित पवार

भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपाने वेळोवेळी आवाज उठविला पण मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १२ आमदारांना वर्षभर बंदी घालण्याविरोधात भाष्य केले.

मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना आमदारांना १२-१२ महिने बाहेर पाठवू नका, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, कुणी चुकले तर त्याला ४ तास बाहेर ठेवा. ते कमी वाटत असेल तर एखादा दिवस बाहेर ठेवा पण १२-१२ महिने बाहेर पाठवू नका, असे ते म्हणाले.

भाजपाने या निलंबनाविरोधात वेळोवेळी आवाज उठविला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन एका वर्षासाठी करण्यात आले होते. तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बाचाबाचीतून हे निलंबन करण्यात आल्याचे बोलले गेले.

अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटले की, काही प्रसंगांबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी मार्ग काढायचा असतो. पण कुणी चुकीचे वागत असेल तर तुम्ही नियम करत नाही तोपर्यंत चुका होतच राहणार. त्यासाठी चूक करणाऱ्या सदस्याला चार तास बाहेर ठेवा. फार तर एक दिवस बाहेर ठेवा. एकदम १२ महिन्यांसाठी बाहेर पाठविणे योग्य नाही.

हे ही वाचा:

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

काँग्रेस स्थापनादिनी पक्षध्वज खाली कोसळला आणि…

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

 

अजित पवार म्हणाले की, विधानसभेत आल्यावर अध्यक्षांना नमस्कार करणे, बाहेर पडताना नमस्कार करणे ही शिस्त आहे. पण अनेक आमदारांनी नमस्कार करणे सोडून दिले आहे. याचा अंतर्मुख होऊन सगळ्यांनी विचार केला पाहिजे.

Exit mobile version