राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता कोणता पक्ष खरा राष्ट्रवादी यावरून रणसंग्राम होणार आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. अजित पवार यांच्या वतीने राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचे चिन्ह (घड्याळ) हे आपलेच असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयोगाला शरद पवार यांच्याकडूनही अशीच याचिका मिळालेली आहे. त्यात या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पक्षावर आपला दावा असल्याचे म्हटले आहे. त्यात राज्यातील महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झालेल्या ९ आमदारांवर कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपल्या समर्थनार्थ आमदार आणि खासदारांचे ४० पेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाने आपली याचिका सादर करताना आपली बाजू ऐकल्याशिवाय कोणत्याही निर्णयाप्रत येऊ नये, असे म्हटले आहे. बुधवारी दोन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे झाले त्यात दोन्ही गटांनी आपापले शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार यांच्याकडे ३२ आमदार असल्याचे दिसत होते तर शरद पवारांकडे १६ आमदार असल्याचे स्पष्ट झाले.
शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, पक्षाचे चिन्ह आमच्याकडे आहे तर पक्षही आमच्याच ताब्यात आहे. ते कुठेही जाणार नाही. ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते आमच्या सोबत आहेत.
हे ही वाचा:
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं
वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह
तीन महिने तरी टोमॅटोचे दर चढेच राहणार
आता निवडणूक आयोग या याचिकांवर विचार करून त्याबाबत निर्णय घेईल. या दोन्ही गटांच्या दाव्यांसंदर्भात संबंधित कागदपत्रे सादर करण्यासही सांगितले जाऊ शकते. शरद पवार यांनी १९९९मध्ये पक्षाची स्थापना केली होती. पण २०२३ला या पक्षाचे विभाजन झाले. अजित पवार यांनी आपल्याला ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करत भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
शरद पवारांनी त्याआधी प्रफुल्ल पटेल, आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे यांची हकालपट्टी करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही पत्र लिहून शपथ घेणाऱ्या ९ आमदारांना अयोग्य घोषित करण्याची मागणी केली आहे.