अजित पवार आणि परिवाराचे कोट्यवधींचे घोटाळे उघड

अजित पवार आणि परिवाराचे कोट्यवधींचे घोटाळे उघड

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या अनेक नातेवाईकांच्या खात्यात अमाप पैसा जमा झाल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे.

गेले १९ दिवस सुरु असलेल्या आयटी आणि ईडीच्या छाप्यांमध्ये १०५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात, अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, आई आशाताई पवार, बहीण विजया पाटील, जावई मोहन पाटील आणि बहीण नीता पाटील यांच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची (शंभरहून अधिक) आवक झाल्याचे समोर आले आहे. याविषयी किरीट सोमैय्या यांनी पत्रकही जारी केले आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिक तुम्ही मर्द असाल तर माझ्याऐवजी देवेंद्रजींना लक्ष्य करा!

ओएनजीसीचे लवकरच खासगीकरण

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल

राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी

किरीट सोमैय्या गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप करताना दिसत आहेत. सोमैय्या हे या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ या मंत्र्यांनंतर नंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सोमैय्यांच्या रडारवर आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात सोमैय्या सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवार, २० ऑक्‍टोबर रोजी सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सोमैय्या यांनी हे जाहीर केले की दुपारी दोन वाजता ते ईडीच्या कार्यालयात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात तक्रार दाखल करणार आहोत. तर यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक संचालकही उपस्थित राहणार असल्याचा दावाही सोमैय्या यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात तक्रार दाखल करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केले आहेत.

Exit mobile version