राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसाठी अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविना झाली आहे.

मुंबईतील धारावी येथे आजचे अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं. शिवाय नागपूरमधील जामा मशिदीतही कमी आवाजात अजान पार पडले. रत्नागिरी, कल्याणसह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा नियम पाळल्याचे मशिदीतील लोकांनी यावेळी सांगितले.

माहीममध्ये नेहमी अजान वाजते, त्यामुळे काही मनसैनिक तिथे हनुमान चालिसा वाजवण्यास गेले होते. पण तिथे गेल्यावर शांततेत अजान आणि नमाज पठण करण्यात आल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. मुंब्रा परिसरातील कौसा जामा मशिदीत आज पहाटे भोंग्याविना नमाज पठण आणि अजान करण्यात आली.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

भोंगे हटविण्यासाठी एकत्र या, आता नाही तर कधीच नाही!

बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा

फरहान अख्तरला ‘तुफान’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

पोलिसांनी मंगळवार, ३ मे रोजी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर कारवाईला सुरूवात केली होती. नोटीसा पाठवल्या होत्या. पण तरीही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे राज्यात पोलीस सतर्क आहेत. या दरम्यान मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.

Exit mobile version