ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

मुंबईचे भूमिपूत्र म्हणून कोळी आगरी समाज हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. परंतु मुंबईतून कोळींना हद्दपार करण्यासाठी तसेच त्यांच्या पारंपरिक धंद्यावर गंडांतर आणण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. परंतु कोळ्यांच्या या आक्रोशापुढे अखेर सरकारला नमते घ्यावेच लागले. त्याचाच आता प्रत्यंतर येत आहे.

ऐरोली जकात नाका येथे काही दिवसांपासून स्थलांतरित झालेले मुंबईतील मासळीबाजार अखेर ऐरोलीतून पुन्हा आधीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आला आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये असलेल्या मासळीबाजाराच्या उभारणीसाठी येथे व्यवसाय करत असलेल्या, मच्छिविक्रेत्या कोळी बांधवांना ऐरोली येथील जुन्या जकात नाक्यावरील मोकळ्या भूखंडाची जागा देण्यात आली होती. मुंबईतील मासळी विक्रेत्यांचा या जागेला विरोध होता.

ऐरोलीतील बाजार पुन्हा एकदा मूळ जागेवर आल्यामुळे आता मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सदर मासळी बाजारामुळे नवी मुंबई, ठाणे, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग या ठिकाणच्या व परिसरातील सर्व मच्छिविक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे मुंबईतील मासळीबाजार इथून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली जात होती. त्याविरोधात कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता.

मुख्य म्हणजे ऐरोली बाजारात काही घुसखोरांनीही मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच या मच्छिमार्केटमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या वाढली होती. शिवाय घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे हा मासळीबाजार परत मुंबईला स्थलांतरित करण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर येथील मच्छिविक्रेत्या महिलांनी आमदार रमेश पाटील यांच्याकडे मागणी केली होती.

हे ही वाचा:

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

उद्धव ठाकरेंविरोधात कानपूरमध्ये तक्रार; वाचा सविस्तर…

बाळासाहेब गेल्यावर ठाकरी शैलीही संपली!

तालिबान पाकिस्तानवरच उलटेल

मच्छिमार्केट तातडीने परत मुंबई येथे स्थलांतरित करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर पोलिस प्रशासनाने हे आंदोलन करू नये, असे सांगून या विषयी तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त झोन ७ मुंबई व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. बैठकीअंतर्गत हा बाजार तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला असे सांगण्यात आले. शिवाय १५ दिवसांच्या आत बाजार परत मुंबईमध्ये हलविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी मासळीबाजार परत मुंबईमध्ये हलविण्यात आला आहे.

Exit mobile version