मुस्लिम आरक्षणाच्या मागणीपुढे ठाकरे सरकार झुकणार?

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीपुढे ठाकरे सरकार झुकणार?

राज्यात मुसलमान समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही काळापासून मागणी जोर धरू लागली आहे. पण या आपल्या मागणीला घेऊन राज्यातील मुसलमान समाज आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या एमआयएम पक्षातर्फे या मागणीला घेऊन मुस्लिम समाजाला चिथावणी दिली जात आहे. एमएम पक्षाने या विषयात पुढाकार घेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढायचे ठरवले आहे. २७ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे हा मोर्चा पार पडणार आहे. त्यासाठी एमआयएम कडून चलो मुंबईची हाक देण्यात आली आहे.

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत या संबंधीची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून ही घोषणा करण्यात आली असून मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मुस्लिम तरुण मुंबईत एकत्र जमतील असे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

राज्यात मुसलमान समाज हा दलित समाजानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मागास समाज आहे. त्यामुळे मुसलमान समाजालाही आरक्षण मिळावे अशी भूमिका एमआयएम मार्फत मांडण्यात आली आहे. मुसलमान समाजाला राज्यात ५ टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येणार आहे. महमूद उर रहेमान कमिटीने मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे असे मत मांडले आहे. तर उच्च न्यायालयानेही मुस्लिमांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण मान्य केले आहे. त्यामुळे मुसलमान समजाला आरक्षण मिळावे असे एमआयएमचे म्हणणे आहे.

त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही गाजण्याची चिन्हे आहेत. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीपुढे ठाकरे सरकार झुकणारा का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version