आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार…शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

अहमदनगरचे नामकरण राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून करण्याची केली गेली होती मागणी

आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार…शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

अहमदनगर या जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नामकरण करण्याची मागणी गेले अनेक दिवस केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या चौंडी येथे हे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने यापुढे ओळखले जाईल अशी घोषणा केली. आमच्या सरकारच्या कार्यकाळात हे नाव अहिल्यानगर होत आहे, याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली.

 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आज आमचा धर्म जिवंत आहे तो अहिल्याबाई होळकरांमुळे. राजमाता अहिल्याबाई होळकर नसत्या तर काशी राहिली नसती, त्या नसत्या तर शिवाची मंदिरे आपल्याला दिसली नसती. त्यामुळे जी मागणी होते आहे त्यानुसार अहमदनगरला अहिल्यानगर नाव दिले पाहिजे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तशी विनंती करणार आहे.

 

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानीही ही मागणी उचलून धरली आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच असे आश्वासन दिले.

 

हे ही वाचा:

मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे तेच १९८०मध्ये दलितांबाबत होत होते!

कुस्तीगीरांच्या आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाची नाराजी

पाद्री, मौलवींचे गणवेश, मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर भुजबळ टीका करतील का?

राज्यशास्त्राच्या विषयातून ‘खलिस्तान’ला हटवले

फडणवीस म्हणाले की, आपलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्ही उस्मानाबादचे नाव धाराशिव केले. छत्रपतींचा मावळा आता मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच. शंकेचे कारणच नाही. आम्ही शिवछत्रपतींचे नाव सांगणारे लोक आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केले आहे.

 

बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेज करण्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली. राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्याची मागणी केली होती.

Exit mobile version