अहमदनगरला भाजपाचा झेंडा; महाविकास आघाडीला ठेंगा

अहमदनगरला भाजपाचा झेंडा; महाविकास आघाडीला ठेंगा

अहमदनगर येथे भाजपाने शिवसेनेला धक्का दिला आहे. माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांनी बाजी मारली आहे. या विजयामुळे महाविकास आघाडीला हादरा बसला आहे. परदेशी यांनी ही निवडणूक ५१७ मतांनी जिंकली आहे.

शिवसेनेचे सुरेश तिवारी यांना २५८९ मते पडली तर परदेशी यांनी ३१०६ मते मिळविली. मनसेचे उमेदवार पोपट पाथरे यांना १७५१ मते मिळाली.

उपमहापौर छिंदम यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी फोनवर केलेल्या बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. फोनवर त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली होती आणि त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर छिंदम हे फरार होते. त्यानंतर छिंदम हे निवडणुकीला पुन्हा उभे राहिले आणि जिंकूनही आले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केल्याबद्दल त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले.

हे ही वाचा:

इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन

सुकेश चंद्रशेखर विरुद्ध नोरा फतेही देणार साक्ष?

 

त्याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली पण तिथे दिलासा मिळाला नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मध्यंतरी झालेल्या निवडणुकांत नागपूर, अकोल्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवून महाविकास आघाडीला धक्का दिला होता.

 

Exit mobile version