अहिल्याबाई होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका

अहिल्याबाई होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता होळकर घराण्याच्या वंशजांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला.

जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, “अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये.” असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आजच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

हे ही वाचा: 

“पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब”- गोपीचंद पडळकर

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता होळकर घराण्याचे वंशज असलेल्या भूषण राजे होळकर यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहू नये. असा संदेश भूषण राजे होळकर यांनी दिला आहे. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे. छत्रपती घराणे सर्व समाजाचे भल्याचा विचार करणारे असल्याने छत्रपती संभाजी राजेंना या कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केल्याचे भूषण राजे होळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Exit mobile version