बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील? नवी मुंबई विमानतळ नामांतर चिघळले

बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील? नवी मुंबई विमानतळ नामांतर चिघळले

नवी मुंबई विमानतळ नामकरण मुद्दा आता दिवसागणिक अधिकच चिघळताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेकडून दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र या विमानतळाला स्थानिकांकडून रायगडमधील लोकप्रिय नेते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी होत आहे. याकरता रायगडवासियांनी आंदोलनाची सुद्धा तयारी आता केलेली आहे.

काही दिवसांपूर्वी शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) संचालक मंडळाने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील विमानतळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्यापासून ते माजी खासदारांच्या नावावर या प्रकल्पाचे नाव घेण्याचा आग्रह धरत होते. त्यामुळे हा नामकरण मुद्दा अधिकच तीव्र होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

आमचा लढा डॉक्टरांच्या विरोधात नसून औषधं माफियांच्या विरोधात

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आयपीएलचे उर्वरित सामने

मालाडच्या मालवणीत बिल्डींग कोसळून ११ जणांचा मृत्यू

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला हरविण्याचा पाकचा ‘डाव’

डिसेंबरमध्ये राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला पत्र लिहून या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना केली. त्यानंतर सिडकोने आपल्या बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला. परंतु या निर्णयावर स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला.

या एकूणच नामकरण मुद्यावरून आता जनआंदोलनाची साद रायगडवासियांनी घातलेली आहे. २४ जूनला सिडकोला घेराव घालण्याचा मानस या स्थानिकांचा आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल-बेलापूर, नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.

Exit mobile version