त्यांनी केले ‘चमकोगिरी’चे आंदोलन

त्यांनी केले ‘चमकोगिरी’चे आंदोलन

राज्यात ऊठसूठ आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला काहीतरी कारण हवेच असते. आता हेच बघा, आंदोलन करण्यासाठी साधेपणापेक्षा माध्यमांवर चमकोगिरी करणे आंदोलकांना महत्त्वाची वाटते. अलीकडील इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या (आप) कडून रस्त्यावर निदर्शने करण्यात आली.

याचवेळी एक विचित्र चित्र दिसून आले ते म्हणजे, शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी दुचाकी चालक आणि वाहनचालकांची गर्दी पाहायला मिळाली. पेट्रोल १००.७२ रुपये प्रति लीटर विक्रमी विक्रमी विक्री करीत होते, तर डिझेल ९२.६९ रुपये प्रति लिटर होते. तरीही सामान्य नागरिकांना मात्र या आंदोलनाचे सोयरसुतक नव्हते.

हे ही वाचा:
‘तुझ्या बापाला’ वर महापौर म्हणतात, मी लिहिलंच नाही

पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’

ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींना अटक

मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत अद्याप अनिश्चितता दुर्दैवी – भाजपा

दादरमध्ये आप पक्षाच्या राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करेन्हास यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रिकेट सामना खेळून इंधनाच्या वाढत्या किमतीस विरोध दर्शविला. मुंबई कॉंग्रेसने बुधवारी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मागठाणे, बोरिवली (पूर्व) मेट्रो मॉलसमोर इंधन दरवाढीविरोधात निषेध मोर्चा काढला. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी बैलगाडी व सायकल रॅलीचे नेतृत्व केले होते. एकूणच या सर्व आंदोलनाचा सूर पाहता हे आंदोलन कमी आणि चमकोगिरी जास्त होती हेच दिसून आले.

इंधनाच्या किंमती आणि पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत १०० रुपये प्रतिलिटर वाढ झाली असली तरी लोक कामासाठी बाइक्सवरून फिरत होते. बोरिवलीतील पेट्रोल पंपावर दुचाकी आणि कारची मोठी गर्दी झाली होती. आता तुम्हीच सांगा, आंदोलन करण्याचा नेमका हेतू हा फक्त लोकांसमोर चमकण्याचा होता हेच खरे आहे की नाही. सर्वसामान्यांना त्यांच्या  रोजी रोटीसाठी बाहेर पडावेच लागणार आहे. पण हे असे उगाच चमकोगिरी करणारे आंदोलक आता डोक्याला त्रास होऊ लागले आहेत.

एकीकडे बैलगाडी सायकल मोर्चा तर दुसरीकडे क्रिकेट खेळून आंदोलन हे आंदोलनाचे प्रकार नाहीत तर हा नुसता आंदोलनाचा बहाणा आहे.एकीकडे कोरोनामुळे लोकांना रस्त्यावर फिरणे बंद केले असले तरी लोकांच्या भल्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा चमकोगिरी करण्याकडे कल असल्याचे या आंदोलनांवरून दिसून आले.

Exit mobile version