नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद भारतासह अनेक देशात उमटत आहेत. यामध्ये आता भारताच्या शेजारील नेपाळ देशानेही उडी घेतली आहे. नेपाळमध्ये राहणाऱ्या हजारो हिंदूंनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ रस्त्यावर रॅली काढली आहे. नेपाळची राजधानी काठमांडू, बीरगंज, पीरगंज आणि इतर शहरांमध्येही ही रॅली काढण्यात आली आहे.
नूपुर शर्मा के समर्थन में नेपाल के काठमांडू में ज़बरदस्त प्रदर्शन। pic.twitter.com/WX3wSKF9vj
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) June 12, 2022
नेपाळमध्ये काढलेल्या या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी होती. यावेळी ‘जय हिंदू’, ‘जय हिंदुत्व’, ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत होते. ‘जो हिंदू शिव आणि राम की नही, कोई काम का नाही’ अशी पोस्टर्सही रॅलीत पाहायला मिळाली. बीरगंज येथील रॅलीदरम्यान, हिंदू धर्माची श्रद्धा धोक्यात असताना आम्ही गप्प बसणार नाही, असं या रॅलीमध्ये सामील झालेल्या एका संताने सांगितले. ते संत म्हणाले की, यापूर्वीही हिंदू धर्माचा अपमान झाला होता. अलीकडेच पाकिस्तानात एक शिवमंदिर पाडण्यात आले. त्यानंतर भारतातील घटनेबाबत मुस्लिमांनी गुंडगिरी केली. त्यामुळे आता शांततेत मिरवणूक काढून आपल्या धर्माचे रक्षण करत आहे. यातही काही जिहादी अडथळे आणत आहेत. हिंदू समर्थकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या आहेत. या रॅलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रचंड वायरल झाला आहे.
हे ही वाचा:
भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक
‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’
‘आमदार सांभाळता न येणं याला संजय राऊत जबाबदार’
रतन टाटा मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने सन्मानित
अहमदाबादमध्ये देखील नुपूर शर्माच्या समर्थनार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरली होती. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढल्याबद्दल ताब्यात घेतलेल्या लोकांना समज देऊन सोडण्यात आले आहे.