राज्यामध्ये कोरोनाचा कहर आणि टाळेबंदी यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. खासकरून रोजंदारी करणारे कामगार चांगलेच भरडले जात आहेत. नुकतेच पुण्यामध्ये दिव्यांगांनी भीक मागो आंदोलन करून सरकारला चांगलीच चपराक लगावली आहे.
हे ही वाचा:
ऑलिंपिकच्या विरोधातील आवाज बुलंद
महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी
लाल किल्ला ताब्यात घेणे हे मोदी सरकारविरोधातील कारस्थान
महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे. छोटे व्यवसाय बंद पडल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रहार संघटना आणि दिव्यांग संघ यांच्यावतीने पोलीस आयुक्तलयाशेजारी भीक मागो आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, दत्ता मिरगणे, सुप्रिया लोखंडे, युवराज नवले आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षापासून सर्वांनाच कोरोना महामारीचा फटका बसलेला आहे. गरीब तसेच गरजू लोकांपुढे अडचणी उभ्या राहात आहेत. अनेक घटकांच्या बरोबरीने दिव्यांग हाही समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांचे रोजगार गेल्यामुळे पोटापाण्यासाठी काय करायचे हा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक लोकांसोबत दिव्यांगाचाही रोजगार गेलेला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील अशा दिव्यांग व्यक्तींना सरकारने पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी हे भीक मागो आंदोलन करण्यात आले.