जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर अभाविप कार्यकर्त्यांकडून निदर्शेने

जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर अभाविप कार्यकर्त्यांकडून निदर्शेने

रविवारी म्हाडाची परीक्षा अचानक रद्द झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आव्हडांच्या निवासस्थानासमोर त्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले.

आम्ही शांतपणे निषेध व्यक्त करत होतो तरी आम्हाला ताब्यात घेतले जात आहे. कालच्या म्हाडाच्या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला त्याविरोधात आम्ही निषेध करत आहे असे म्हणत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जितेंद्र आव्हाड पोलिस बळाचा वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली.

म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाली त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान अशी थट्टा तरी करू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सांगितले. तर महाराष्ट्र भाजपाचे युवा आमदार राम सातपुते यांनी जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

‘राऊतांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे’

हरनाज संधू बनली ‘मिस युनिव्हर्स’

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली काशी

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल

महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागातील भरती परीक्षांचा गोंधळ सुरूच असून महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या भरतीतील गोंधळानंतर रविवारी म्हाडाच्या भरती परीक्षेत गोंधळ झाला. रविवार, १२ डिसेंबर रोजी होणारी ‘म्हाडा’ ची भरती परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्यात आली. शनिवारी (११ डिसेंबर) रोजी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातील घोषणा केली.

Exit mobile version