उद्धव ठाकरेंना ‘बेस्ट सीएम’ ठरवण्यामागे काँग्रेसचा हात?

उद्धव ठाकरेंना ‘बेस्ट सीएम’ ठरवण्यामागे काँग्रेसचा हात?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये सर्वोत्तम ठरले असल्याच्या बातम्या गेले काही दिवस माध्यमांमध्ये झळकत आहेत. पण या सर्व्हे करणाऱ्या एजन्सीचे काँग्रेस पक्षाशी कनेक्शन असल्याचीही बाब समोर आली आहे. ‘प्रश्नम’ या सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीने हा सर्व्हे केला असून चिराग पटनाईक हे या एजन्सी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पटनाईक हे काँग्रेसच्या मीडिया सेलचे काम बघत होते.

‘प्रिंट’ ने दिलेल्या वृत्तानुसार प्रश्नम या एजन्सीने १३ राज्यांमध्ये सर्वेक्षण करून त्यात उद्धव ठाकरे सर्वोत्तम असल्याचे सांगण्यात येते. पण हा सर्व्हे आल्यापासूनच समाज माध्यमातून या सर्व्हेवर प्रश्न होते. ‘वर्क फ्रॉम होम’ मध्ये गूंग असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कशाच्या आधारे सर्वोत्तम ठरले हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला सतावत असतानाच आता या सर्व्हे करणाऱ्या एजन्सी विषयी काही महत्वाचे दाखले समोर आले आहेत. ज्यातून या ‘प्रश्नम’ संस्थेशी संबंधित चिराग पटनाईक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते ही बाब सामोर आली आहे.

हे ही वाचा:

टाळेबंदीला कंटाळून व्यावसायिकाने केला आत्मघात

बापरे! पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?

कल्याण डोंबिवलीमध्ये बेकायदा बांधकामांचे पीक

पटनाईक हे काँग्रेसच्या मीडिया सेलचा एक भाग होते. २०१८ मध्ये त्यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवला होता. काँग्रेसच्या आयटी सेलच्या एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा ठपका ठेवला होता. त्यावेळी त्यांना अटकही करण्यात आली होती. पण नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

प्रश्नम या संस्थेने केलेला सर्व्हे या पूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सर्व्हेचा हवाला देत राहुल गांधी यांनी भारत सरकारवर कोविड मृत्यू लपवल्याचे आरोप केले होते. पण त्यावेळीही नेटकऱ्यांनी या सर्व्हेचा फोलपणा उघड केला होता. महाराष्ट्र वर्ल्ड नावाच्या पोर्टलने या विषयीचे वृत्त दिले आहे.

Exit mobile version