27 C
Mumbai
Monday, March 17, 2025
घरराजकारणअफझलखान, औरंगजेबची कबर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही

अफझलखान, औरंगजेबची कबर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा

Google News Follow

Related

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची कथा सांगणारा ‘छावा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. पण, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणून पुन्हा एकदा त्यांची शौर्यगाथा प्रकाशझोतात आणली. या सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीला स्थान नसल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ही कबर नष्ट करावी यासाठी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला आहे. या मुद्द्याचे पडसाद लोकसभा, राज्यात विधानसभेतही उमटताना दिसले. अनेक राजकीय नेत्यांनीही औरंग्याची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच कबर नष्ट करणार असल्याचा इशाराही दिला आहे. माध्यमांशी बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांनीचं महाराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला की, अफजल खान ज्याने आई भवानी तुळजाईचे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो स्वराज्य विस्ताराकरता आलेला. आव्हाड म्हणतात, अफझलखान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. आता खोट्या इतिहासाला लोकांनी नाकारलं असून अफझलखान आणि औरंगजेबची कबर नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा कठोर इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

हे ही वाचा..

छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार समान संधी

सुनीता विल्यम्स यांचा माघारी येण्याचा मार्ग मोकळा; नासाचे पथक अंतराळ स्थानकावर पोहोचले

पहिले सीडीएस जनरल रावत यांच्या जयंतीदिनी सैन्यदलाकडून स्मरण

न्यायालयाच्या आदेशानंतर संभल येथील जामा मशिदीच्या रंगकामाला सुरुवात

यापूर्वीही अतुल भातखळकर यांनी म्हटले होते की, औरंगजेबची कबर सजवण्याची आवश्यकता काय आहे? औरंगजेबच्या थडग्यावर जाऊन विरोधकांना फुल उधळण्याची आवश्यकता काय आहे? यांना केवळ औरंगजेबाचा थडगे सजवून मुस्लिम तुष्टीकरण करण्याची गरज आहे. विरोधकांना एवढाच इशारा देईन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचे पाप तुम्ही इतकी वर्षे केले आहे. आज हिंदू समाज जागृत झालेला आहे यापुढे औरंगजेबचे थडगं वाचवण्याचा जास्ती प्रयत्न केला तर हिंदू समाज त्या औरंगजेबच्या थडग्यात तुम्हाला पुरल्या शिवाय राहणार नाही,” असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा