मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान
देश, राज्य तुम्ही जिंकलंत आता मुंबई महानगरपालिका पण तुम्हीच जिंकणार का? मग आम्ही काय धुणीभांडी करायची का, असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात विचारला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
भारतीय जनता पार्टीने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ला राज्यातही भाजपाचे सरकार होते. पण आता मुंबई महानगरपालिकेतही त्यांना सत्ता कशाला हवी असा उद्धव ठाकरे यांचा विचारण्याचा रोख आहे. लोकसत्ताने वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब (ठाकरे) भाजपाला म्हणाले होते की, तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी भांडी करायची का?
हे ही वाचा:
९३ एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आत्महत्या; सरकारला चिंता नाही
चेहेरे बदलून भविष्य बदलणार का?
दाऊदच्या प्रॉपर्टी प्रफुल पटेल पण गोत्यात येणार?
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचा खर्च भारत सरकार करणार
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुखाच्या थाटात भाषण केले. ते म्हणाले की, सत्ता मिळवा पण लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं मलाच मिळालं पाहिजे. सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळविल्यामुळे देशातलं राजकारण नासले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणे योग्य नाही, असे सांगत देशाच्या राजकारणाला चांगली दिशा मिळाली पाहिजे. सत्तापिपासूपणामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडले आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.