रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार

रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार

केंद्र सरकार आणि सोशल मीडिया ट्विटर यांच्यात नवीन आयटी नियमांवरुन अद्यापही तणाव सुरु आहे. ट्विटर वगळता देशातील सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता तर ट्विटरने कहर केला आहे, थेट भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अकाउंटवरून ‘ब्लू टीक’ काढून टाकली होती. उपराष्ट्रपतींपाठोपाठ रा. स्व. संघाच्या अनेक नेत्यांची ‘ब्लू टीक’ ट्विटरने काढली आहे. काही तासांतच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया बघून ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या अकाउंटवर ब्लू टीक पुन्हा बहाल केली आहे.

रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश सोनी, अरुण कुमार, कृष्ण गोपाल, भय्याजी जोशी यांच्या अकाउंटवरील ब्लू टीक ट्विटरने काढून टाकली आहे.

ब्लू टीक’ हे ट्विटरमधील हे मानक आहे. ‘ब्लू टीक’ हे व्हेरीफाईड अकाउंट्स दर्शवतात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या, कंपन्यांच्या किंवा संस्थांच्या अधिकृत अकाउंटवर ‘ब्लू टीक’ असते. यामुळे या अकाउंट्स वरून केलेल्या ट्विट्सचा रिच म्हणजेच प्रसार वाढतो. ट्विटरने ज्या प्रकारे आज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंट वरून ‘ब्लू टीक’ काढली त्याचप्रकारे याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ट्विटरने कायमचे बॅन केले होते.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंटवरील ‘ब्लू टीक’ ट्विटरने काढली

बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार

महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा

राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो

ट्विटरने डाव्या राजकीय विचाराविरुद्ध बोलणाऱ्या सर्व नामांकित व्यक्तींच्या अकाउंटला चाप लावण्याचे ठरवले आहे. ट्विटरने भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये या प्रकारे कारवाई केली आहे. यातच रा. स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अकाऊंची ब्लू टीक आज काढण्यात आली आहे.

Exit mobile version