27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरेनंतर शरद पवारांच्या पक्षाबाबत टिकटिक सुरू!

उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांच्या पक्षाबाबत टिकटिक सुरू!

निवडणूक आयोगाचा निकाल कुठल्याही क्षणी येणाची शक्यता

Google News Follow

Related

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि आमदार अपात्रता प्रकरणावर काल (१० जानेवारी) निकाल दिला.सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचे त्यांनी निकालात सांगितले.या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्या मागचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.शिवसेनेच्या निकालानंतर आता शरद पवारांचे टेंशन वाढले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाकडे जाईल याची धाकधूक त्यांना लागल्याची माहिती आहे.

मूळची खरी शिवसेना अखेर एकनाथ शिंदे यांची ठरली.सभापतींच्या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. अशीच परिस्थिती शरद पवार गट आणि अजित पवार गटाची होणार आहे.राष्टवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाकडे जाईल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राष्ट्रवादी नेमकी कोणाची तसेच राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निवडणूक आयोगातील निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो नंतर निकाल अद्याप आलेला नाही. निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष नेमका कुणाचा? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी ८ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे.

दरम्यान,१६ जानेवारीपासून राष्ट्रवादीतील फुटीबाबत सुनावणी होणार आहे.याबाबत ३१ जानेवारीपर्यंत निणर्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेबाबतच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनाही टेंशन आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा