महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. जागा वाटपावरून कलह झाल्याचे चित्र दिसून आले असून आधी तीन मुख्य पक्षांसाठी ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र, यात बदल होतील असे वारंवार काही वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान आता महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. काही जागांवर अद्याप महाविकास आघाडीतल घटक पक्षांमध्ये वाद असून काही जागांवरील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटानेही शनिवारी सकाळी त्यांची दुसरी यादी जाहीर केली.
ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीनंतर आता काँग्रेसकडूनही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २३ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये भुसावळ, वर्धा, अकोट, मुंबईतील काही मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन अजूनही चर्चा सुरु असून आता हळूहळू बैठकानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात
माविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५ घोषित
इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले
‘बेकायदा मशिदींविरोधात हिंदूंनी आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल’
भुसावळ – राजेश मानवतकर, जळगाव – स्वाती वाकेकर, अकोट – महेश गणगणे, वर्धा – शेखर शेंडे, सावनेर – अनुजा केदार, नागपूर दक्षिण – गिरिश पांडव, कामठी- सुरेश भोयर, भंडारा – पूजा ठवकर, अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड, आमगाव – राजकुमार पुरम, राळेगाव – वसंत पुरके, यवतमाळ – अनिल मांगुलकर, आर्णी – जितेंद्र मोघे, उमरखेड – साहेबराव कांबळे, जालना – कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख, वसई – विजय पाटील, कांदिवली पूर्व – काळू बधेलिया, चारकोप – यशवंत सिंग, सायन कोळीवाडा – गणेश यादव, श्रीरामपूर – हेमंत ओगले, निलंगा – अभय कुमार साळुंखे, शिरोळ – गणपतराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.