राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह सरकारमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंगळवार, ४ जुलै रोजी शिंदे- फडणवीस- पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आठ महत्त्वाचे निर्णय घेतले.
प्रदूषणविरहित, स्वस्त आणि मोठा ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या हायड्रोजनचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले आहे. तसेच ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणाारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. याशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –
- राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
- मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
- दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
- नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
- सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
- नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
- मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे.
आगामी काळात ग्रीन हायड्रोजनवर देशांची मोठी गुंतवणूक असणार आहे. भविष्यात याची मोठी गुंतवणूक झाल्यास हायड्रोजनची किंमत कमी होऊन कमी किंमतीत हे इंधन उपलब्ध होऊ शकेल.
हे ही वाचा:
भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?
उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी
२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट
फ्रान्समध्ये हिंसाचार प्रकरणी ३ हजार अटकेत; बहुसंख्य मुस्लिमांचा समावेश
ग्रीन हायड्रोजन
ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे केले जाते. आणि ह्या प्रक्रियेला विद्युतविघटन(इलेक्ट्रोलिसिस) म्हणतात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायजरचा वापर करण्यात येतो.