एग्झिट पोलनंतर आता सर्वांच्या नजरा मतमोजणीकडे लागल्या आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी केंद्रावर नजर ठेवणारी पथके तैनात करण्याची रणनितीही आखण्यात आली आहे. निवडणूक एजंटना पहाटे पाच वाजताच मतमोजणी केंद्रांवर पोहोचण्याचे निर्देश राजकीय पक्षांनी दिले आहेत. त्यांना विशेषतः मतमोजणीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या पर्वातील पराभव-विजयाचा निर्णय ४ जून रोजी होईल. सकाळी १० वाजल्यापासून पराभव आणि विजयाचा ट्रेन्ड लोकांना माहीत पडेल. निवडणूक आयोग ऑनलाइन अपडेट देईलच, शिवाय राजकीय पक्षांचे निवडणूक एजंटसुद्धा प्रत्येक राऊंडला मिळालेल्या मतांची आकडेवारी राजकीय पक्षांना देतील. मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवतील. पक्ष आणि विरोधी पक्षांना मिळणारी मते जाहीर केली जातील. त्यांच्या उपस्थितीत ईव्हीएमची तपासणी केली जाईल.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर सुमारे ९० निवडणूक एजंट तैनात असतील. विविध विधानसभा मतदारसंघात लावण्यात आलेल्या टेबलवर ते तैनात केले जातील. मतमोजणी करताना ईव्हीएम बिघडल्यास किंवा व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांमध्ये गडबड झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांना ते सूचित करतील. राजकीय सूत्रांनुसार, ७५ टक्के निवडणूक एजंट जुनेच असतील, कारण त्यांना मतगणनेचा अनुभव असेल. त्याशिवाय प्रत्येक उमेदवार आपल्या जवळच्या माणसांना मतगणना केंद्रावर तैनात करेल. ही माणसे प्रत्येक टेबलवर नजर ठेवतील.
हे ही वाचा:
मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता
उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश
राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!
मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला
मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल
४ जून रोजी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. याची तयारी मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक करतील. पहाटे पाच वाजता राजकीय कार्यकर्ते केंद्रांवर पोहोचतील. तिथे निवडणूक अधिकारी सर्वांना मार्गदर्शन करतील. एजंटच्या सर्व शंकाकुशंकाचे निरसन करतील. त्यानंतर त्यांना जिथे मतमोजणी होत आहे, त्या टेबलवर पाठवले जाईल. मोबाइलसह कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्याची परवानगी नसेल. ईव्हीएमनंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी होईल. प्रत्येक फेरीच्या मतमोजणीनंतर पर्यवेक्षक, उमेदवारांचे एजंट त्यांची सहमती दर्शवतील आणि स्वाक्षरी करतील. अनिवार्य व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाईल. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मतमोजणीत फरक असल्यास दुसऱ्यांदा मतमोजणी होईल. दोन्ही आकडेवारीची गणना सारखी नसल्यास व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी मान्य केली जाईल.