गेल्या तीन दिवसांपासून खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणला बसले होते. संभाजीराजे यांनी ज्या मराठा आरक्षणासाठी मागण्या केल्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आहेत. म्हणून आज संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले होते.
संभाजी राजे यांच्या उपोषणाला मिळणारा वाढता पाठिंबा बघता ठाकरे सरकारला घाम फुटला. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची धावपळ उडाली आणि संभाजीराजे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या.
आज उपोषणादरम्यान संभाजीराजे यांच्या शरीरातील शुगरचे प्रमाण कमी झाले होते. आणि त्यांना अशक्तपणा, डोकेदुखीही जाणवत होती. परंतु संभाजीराजेंनी कुठलीही औषधं घेण्यास नकार दिला. मात्र मागण्या मान्य केल्याने संभाजीराजे यांच्या चेहऱ्यावर आनंद आसांडुन वाहत होता. संभाजीराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिता राजे या देखील उपोषणाला सोबत होत्या. त्यांनी देखील आपण उपोषण मागे घेत असल्याचे म्हटले आहे.
उपोषण मागे घेतल्यावर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” आरक्षणासाठी २००७ पासून मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे ते आज सत्कारणी लागला आहे. ज्या मागण्या मी सरकारसमोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. ”
मराठा आरक्षणासाठी ज्यांनी संभाजी राजे यांना पाठींबा दिला त्यांचे संभाजी राजे यांनी आभार मानले आहे. आज महाविकास आघाडीचे मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे,अमित देशमुख यांच्यासह इतर नेते उपोषण स्थळावर उपस्थित होते.
हे ही वाचा:
कुस्तीपटू रवी दहियाने ‘यासार डोगू’ मालिकेत जिंकले सुवर्णपदक!
डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती
News Danka Impact: त्याच विभागात पुनर्वसनाच्या मागणीसाठी भाजपा मैदानात
राज्य सरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या आहेत. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.