अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज

अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज

लोकसभा निवडणुकीत अयोध्या मतदारसंघात भाजपच्या झालेल्या पराभवानंतर रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लहरी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला मत न देणाऱ्या अयोध्येतील मतदारांवर त्यांनी टीका केली आहे.

अयोध्येचा समावेश असणाऱ्या फैजाबाद मतदारसंघात भाजपचे लल्लू सिंह यांचा समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केला. हा निकाल पाहिल्यावर सुनील लहरी यांनी निराशा व्यक्त केली. त्यांनी अयोध्येसारख्या पवित्र शहरातील लोकांवर आपल्या राजाशी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यांना स्वार्थी असे संबोधले. ‘आपण हे विसरलो की, ते अयोध्यावासी आहेत. ज्यांनी वनवासातून परतल्यानंतर देवी सीतेवर संशय व्यक्त केला होता. हिंदू असा समाज आहे की, त्याच्यासमोर ईश्वर जरी प्रकटला तरी त्यालाही तो नाकारेल… स्वार्थी’ अशी प्रतिक्रिया सुनील यांनी दिली आहे.

‘इतिहास साक्षीदार आहे, अयोध्यावासींनी नेहमीच आपल्या खऱ्या राजाशी विश्वासघात केला आहे. धिक्कार आहे,’ असेही त्यांनी लिहिले आहे. त्यांनी दुसरी पोस्टही लिहिली आहे. त्यात त्यांनी ‘अयोध्यावासी, तुमच्या महानतेला सादर नमन. तुम्ही जिथे माता सीतेला सोडले नाही, तिथे रामाला तंबूतून बाहेर काढून भव्य मंदिरात विराजमान करणाऱ्यांचा विश्वासघात करणे, ही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. संपूर्ण भारत कधीही तुम्हाला चांगल्या नजरेने बघणार नाही,’ असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

अवघी २.५ टक्के मते, आठ जागांवर विजय

बायडेन-सुनक आणि पुतिन यांनी केले मोदी यांचे अभिनंदन

आज शिवाजी राजा झाला…! रायगड ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुसज्ज

मुस्लिम महिलांनी मतं तर दिली, आता ‘गॅरंटी कार्ड’ घेण्यासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा

सुनील यांनी ‘रामायणा’त रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांचेही विजयासाठी आभार मानले. अरुण गोविल यांनी उत्तर प्रदेशातील मेरठमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुनीता वर्मा यांचा १० हजार ५८५ मतांनी पराभव केला.

Exit mobile version