‘तांडव’ पाठोपाठ ‘मिर्झापूर’ ही वादाच्या भोवऱ्यात

‘तांडव’ पाठोपाठ ‘मिर्झापूर’ ही वादाच्या भोवऱ्यात

 

ॲमेझोन प्राईम वरिल तांडव वेब सिरिज विरोधात देशभरात एफआयआर होत असतानाच आता प्राईमची आणखीन एक सिरिज अडचणीत आली आहे. ॲमेझोन प्राईम वरिल ‘मिर्झापूर’ या सिरिजला सर्वोच्च न्यायालयाने नोटिस पाठवली आहे. मिर्झापूर मध्ये राहणाऱ्या एका स्थानिक नागरिकाच्या जनहित याचिकेवर कार्यवाही करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

‘मिर्झापूर’ या नावाची वेबसिरिज ॲमेझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. दोन सिजन असणारी ही सिरिज अतिशय लोकप्रिय झाली होती. पण आता ही सिरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नोएडामधील एस.के.कुमार या वकिलानी मिर्झापुर विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मालिकेतील दृश्य आणि संवादांमुळे उत्तर प्रदेश राज्याची प्रतिमा मालिन होते असा आरोप कुमार यांनी केला आहे. 


मिर्झापूर जिल्ह्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे, पण या वेब सीरिजच्या माध्यमातून मिर्झापूर शहराला गुंड आणि व्यभिचारी लोकांचा अड्डा दाखवण्यात आला आहे.” असे या जनहित याचिकेत म्हटले आहे. या याचिकेत महिलांना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यावरही आक्षेप घेण्यात आले आहे. या सिरिज मध्ये मिर्झापूर जिल्ह्यातील महिलेचे सासऱ्या सोबत आणि घरातील नोकरासोबत अनैतिक संबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. “अशाप्रकारची चुकीची दृश्ये शहराच्या नावावर दाखवून मिर्झापूरच्या समृद्ध परंपरेचा आणि ३० लाख नागरिकांचा अपमान करणात आला आहे.” असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Exit mobile version