सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं

सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत होता. अखेर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन त्यांचे उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होतं. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते.

मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची प्रत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवा जीआर सुपूर्द केला. यामध्ये मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यात मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांनी हा जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं.

जरांगे पाटील यांना जीआर सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबईतील वाशीमध्ये आले होते. एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. सभेआधी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

हे ही वाचा:

जरांगे म्हणतात आमचा विरोध संपला; आरक्षणाबाबत सरकारकडे अध्यादेश तयार

मोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनी महिला शक्तीचे दिसले सामर्थ्य

प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!

जरांगे यांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा निर्धार केला होता. रात्रीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते त्यांच्या समर्थकांसह मुंबईत प्रवेश करतील, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. शुक्रवारी वाशीतील शिवाजी चौक येथे झालेल्या सभेत जरांगे यांनी ते आता केवळ पाणी पित असल्याचे जाहीर केले होते.

Exit mobile version