गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व भाजपा नेत्या पंकजा मुंडे, त्यांच्या भगिनी तसेच त्यांचे बंधू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यानंतर आता आणखी एक मुंडे आडनाव राजकारणात दिसणार आहे.
धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता राजकारणात उतरण्याचे ठरविले आङे. त्यांनी शिवशक्ती सेना या पक्षाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा निर्णय घेतला असून हा पक्ष निवडणुकीतही उतरणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक घोटाळे समोर आले आहेत. या घोटाळ्यामुळे अनेक परीक्षाही रद्द झाल्या आहेत. मंत्रीच एक दोन हजार कोटींचे घोटाळे करतात. हा भ्रष्टाचार संपवण्याचे काम माझा पक्ष करपणार आहे.भ्रष्टाचार नेते आणि मंत्री करतात पण बळीचा बकरा मात्र अधिकारी आणि पोलिसांना केले जाते, असेही त्या म्हणाल्या.
३० जानेवारीला या पक्षाचे चिन्ह, पक्षाचे बोधचिन्ह व निवडणूकीची आचारसंहिता हे जाहीर केले जाईल, असे करुणा मुंडे म्हणाल्या. निवडणूक लढविण्याची वेळ येईल तेव्हा परळीमध्येच निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’
ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’
मॅटिनी शो साठी प्रसिद्ध चित्रपटगृह
मोदींचा फोटो आणि ढोंगबाजांचा अजेंडा
मूळच्या करुण शर्मा यांच्याशी २००३पासून परस्पर सहमतीने संबंध असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. पण नंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याविषयी स्पष्टीकरण दिले. करुण आणि आपल्याला दोन मुले असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यासंदर्भात आपल्या कुटुंबियांना माहीत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.