काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंची केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे यांनी भेट घेतली आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एन. सी यांनीदेखील राज ठाकरेंनी भेट घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे मनसेचे निवडणूक चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे, त्याच रेल्वे खात्याचे दानवे हे राज्यमंत्री असल्याने त्यांनी राज ठाकरे यांना रेल्वे ईंजिनाची प्रतिकृती भेट दिली आहे. शायना एन.सी यांचीदेखील राज ठाकरे यांनी भेट घेतल्याचे गडकरी यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री @RajThackeray यांच्या बरोबर भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. pic.twitter.com/zvaof4RHck
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) April 9, 2022
राज ठाकरे यांच्या भाजपा नेत्यांना वाढत्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका यामुळे देखील चर्चेला जोर धरला आहे. मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोग्यांविरोधात व्यक्तव्य करत हनुमान चालीसा लाऊ अशी कठोर भूमिका ठाकरेंनी घेतली होती. त्यावर सुद्धा राज ठाकरे चर्चेत आले आहेत.
हे ही वाचा:
१८ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार बुस्टर डोस
आता यूपीतील जनतेला मिळणार देशात कुठेही रेशन
पोलिसांना आंदोलनाची कल्पना होती हे एफआयआरमधून स्पष्ट
गोव्याच्या मंत्रिमंडळात आता झाले १२ मंत्री
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हासुद्धा राजकीय चर्चेला उधान आल होते. मात्र गडकरी यांनी ही भेट वैयक्तिक कारणावरून असल्याचे स्पष्ट सांगितले होते.