निलेश राणेंनंतर सुशीलकुमार शिंदेंचाही राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत मांडली भूमिका

निलेश राणेंनंतर सुशीलकुमार शिंदेंचाही राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’

दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार,” अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी मांडला आहे. ते सोलापुरात बोलत होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार असतील. असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी पुढच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “मी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की, प्रणिती ताईच काँग्रेसच्या उमेदवार राहतील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखाच आहे. पण जी काही मदत लागेन ती मी करत राहीन हे मी तुम्हाला सांगतो.”

हे ही वाचा:

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक?

नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज

चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स

चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

दसऱ्यानिमित्त आज सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनीही त्यांची राजकीय निवृत्ती जाहीर केली. राजकरणात मन रमत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

Exit mobile version