उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे

उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ प्रचाराच्या मैदानात

उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे

लोकसभा निवडणूकीचे पहिले चार टप्पे यशस्वी पार पडले असून पाचव्या टप्प्यात इतर राज्यांसह मुंबईत सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईतील जागांवर कोण बाजी मारणार याकडे लक्ष असतानाचा सर्व पक्षांकडून मुंबईत प्रचारासाठी अधिकचा जोर लावला जात आहे. भाजपाकडूनही मुंबईत जोरदार प्रचार सुरू आहे. बडे बडे नेते प्रचारात सहभागी होत असून पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील रोड शो मुंबईत पार पडणार आहे. बुधवारी रात्री हा भव्य असा रोड शो पार पडणार असून नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील निवडणुकीसाठी मुंबईत येणार आहेत. योगी आदित्यनाथ हे मुंबईत रोड शो करणार आहेत. महायुतीचे उमेदवार मुंबईच्या जागांवर उभे असून या लढती प्रतिष्ठेच्या होणार आहेत. त्यामुळे सर्वांचेचं याकडे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा:

बँक कर्मचारीचं निघाले चोर, लंपास केले ४२ लाख रुपये!

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुण्याच्या नारायणगावातून पोलिसांनी ७० जणांना घेतलं ताब्यात

‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’

चिनी फंडिंगचे आरोप असलेल्या ‘न्यूज क्लिक’च्या संपादकांची अटक अवैध

उत्तर मुंबई मतदार संघातून महायुतीकडून उज्वल निकम निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थचं योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथे १८ मे रोजी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड या उज्ज्वल निकम यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. २० मे रोजी या जागेसाठी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version