रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या मालकाची मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अशाप्रकारे ताब्यात घेणे हा कृतघ्नपणा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
प्रविण दरेकर यांनी रविवारी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून दुपारी ब्रुक कंपनीच्या मालकाला दम भरला जातो. त्यानंतर संध्याकाळी १० ते १५ पोलीस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकता त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलतात. हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे, तेच कळत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
हे ही वाचा:
लस उत्पादनासाठी संपूर्ण क्षमता वापरा
शिवसेना नेत्याने पुन्हा पातळी सोडली
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कुंभमेळ्याविषयी महत्वाचा निर्णय
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपाच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.