काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी, फडणवीसांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण

काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी, फडणवीसांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजपा खासदार रक्षा खडसे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी करणार आहेत. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करतील.

वेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी जाणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफानी हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला अतोनात त्रास दिला, अक्षरश: पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं असा आरोप त्यावेळी एकनाथ खडसे यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी काल ३१ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

हे ही वाचा:

भारताने फटकारल्यानंतर डब्ल्यूएचओने कोरोना उपप्रकाराचे नाव बदलले

कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांची घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक

अजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Exit mobile version