आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकजूट करण्याच्या विरोधकांच्या मोहिमेला खिंडार पडताना दिसत आहे.पश्चिम बंगालनंतर पंजाबमधील आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.इंडी आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील सर्व १३ जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे.पंजाबच्या या जागांवर कोणाशीही तडजोड केली जाणार नाही, असे भगवंत मान म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीतून बाहेर पडत ‘एकला चलो’चा नारा दिला. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले. ममता बॅनर्जी यांच्या घोषणेने देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुद्धा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
सूर्या ठरला ‘टी- २० प्लेअर ऑफ दि इअर’
राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!
‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!
पाकिस्ताननंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही राम मंदिर निर्माणासंबंधी ओकली गरळ
पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री मान मानले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील सर्व १३ जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे.या जागांवर कोणाशीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.तसेच या १३ जागांसाठी सुमारे ४० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील विविध राज्यांमध्ये इंडी आघाडीत फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत.बंगाल आणि पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.त्याच बरोबर याचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची खात्री आहे.