महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी

महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा करताच या योजनेला विरोध करण्यासाठी काही राज्यांमध्ये तरुणांनी निषेध नोंदवला. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या योजनेचं कौतुक केलं तसेच महिंद्रा ग्रुप्समध्ये अग्निवीरांना संधी मिळेल अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. त्यानंतर अजून एका मोठ्या उद्योगसमूहाने अग्निवीरांना त्यांच्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकेल असं सांगितलं आहे.

अग्निपथ योजनेला पाठिंबा देण्यासाठी देशातील मोठमोठे उद्योग समूह पुढे येत आहेत. अग्निपथ योजनेला केवळ समर्थनच नव्हे, तर अग्निवीरांना त्यांच्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहेत असं सांगण्यात येत आहे.

महिंद्रा ग्रुपनंतर देशातील महत्वाचा उद्योग समूह असणाऱ्या टाटा सन्स कंपनीसह इतर बड्या उद्योग समुहांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरीची संधी असेल अशी घोषणा केली आहे.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरीच्या संधी उपलब्ध असतील असं आश्वासन दिलं आहे. तसेच, त्यांनी अग्निपथ योजनेलाही पाठिंबा दिला आहे. अग्निपथ योजना देशाच्या संरक्षण दलात सेवा बजावण्याची उत्तम संधी असून, अशा तरुणांचे टाटा समुहात स्वागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे ‘हे’ आमदार एकनाथ शिंदेंसोबत

‘धर्मवीर’चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

त्यापूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं की, “अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या हिंसाचारामुळे दुःख होत आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीर या कालावधीत जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो,” असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

Exit mobile version