राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

भाजप मोठ्या नेत्यांना तेथे रिंगणात उतरवू शकते

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

राजस्थानच्या सत्ताधारी काँग्रेसविरोधातील नाराजीचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत घेण्यासाठी भाजप मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

 

तसेच, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी भाजप मोठ्या नेत्यांना तेथे रिंगणात उतरवू शकते. यामध्ये काही खासदारांचा समावेशही असू शकतो. भाजपतर्फे सर्वांत प्रथम पराभूत झालेल्या मतदारसंघांतील उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.

 

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये राज्यातील नेत्यांसोबत निवडणुकीची तयारी आणि उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. तसेच, मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्याची तयारीही केली जाणार आहे.

हे ही वाचा:

जुहू समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात तरुणावर वीज कोसळली

गुजरातमधून ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त

आशियाई देशातील भिकाऱ्यात ९० टक्के पाकिस्तानी!

मोदींनी दानपेटीत नोटा टाकल्या होत्या, पाकीट नव्हे

भाजपकडून ‘ड’ श्रेणीतील मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दोन ते तीन वेळा पराभूत झालेले मतदारसंघ भाजपने या ‘ड’ श्रेणीत नमूद केले आहेत. या श्रेणीत १९ मतदारसंघ आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत झालेल्या मतदारसंघांतून किमान सहा खासदारांना उभे केले जाऊ शकते. खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उभे केल्यास नवे चेहरेही मिळू शकतात. तसेच, लोकसभेतही भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत २५पैकी २४ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर, एक जागा एनडीएचा घटक पक्ष आरएलपीने मिळवली होती. तसेच, गेल्या वेळेपेक्षा यंदा अधिक महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते.

 

केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

 

या आठवड्याच्या अखेरीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. यावेळी राजस्थानच्या सुमारे ४० उमेदवारांची चर्चा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने भलेही वसुंधरा राजे यांना पक्षाचा चेहरा म्हणून समोर आणलेले नाही, मात्र उमेदवारांची निवड करताना त्यांचा सल्ला घेतला जात आहे.

Exit mobile version