मुख्यमंत्री मंत्रालयात याची बातमी व्हावी एवढे वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत. हा दिवस उगविण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे महाप्रलयाची स्थिती आहे. कोल्हापूर, सातारा, रायगड, कोकण येथे महापूर आलेला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर पुरामुळे शहरे, गावे पाण्याखाली गेली आहेत. जवळपास ५० जणांचा मृत्यू आतापर्यंत ओढवला आहे. पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन व संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्याचे आदेश दिले. त्यामुळे आता चहुबाजूंनी टीका होऊ लागली आहे.
मुख्यमंत्री मंत्रालयात… ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत….हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले…https://t.co/daAwJ1stT8
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 23, 2021
हे ही वाचा:
तळई येथे शासनाकडून उशिराने मदतकार्य
आधीच लॉकडाऊन, त्यात पावसानेही झोडपलं
रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू
ऑलिंपिकच्या बोधवाक्यात १२७ वर्षांनी बदल
अतिवृष्टीची व्याख्या बदलावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. त्यावरही आमदार भातखळकर यांनी शरसंधान साधले. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पाऊस मोठा आहे, संकट मोठे आहे पण प्रयत्न थिटे आणि नेतृत्व खुजे आहे. अतिवृष्टीची व्याख्या बदलावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. त्यांनीही वर्षभर घरी बसून मुख्यमंत्रीपदाची व्याख्या बदलली आहेच की…
मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वतः गाडी चालवत पंढरपूर गाठले होते. तेव्हा त्यांचे प्रसारमाध्यमांनी प्रचंड कौतुक केले मग आता महाराष्ट्रावर एवढी संकटे कोसळत असताना मुख्यमंत्री गाडी घेऊन का संकटस्थळी जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी आलेल्या निसर्ग वादळानंतर आणि यंदाच्या तौक्ते वादळानंतरही मुख्यमंत्र्यांनी धावती भेट दिली होती. त्यावरूनही टीका झाली होती.
पाऊस मोठा आहे, संकट मोठे आहे, परंतु प्रयत्न थिटे आणि नेतृत्व खुजे आहे. अतिवृष्टीची व्याख्या बदलावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणतायत. त्यांनीही वर्षभर घरी बसून मुख्यमंत्री पदाची व्याख्या बदललीच आहे की… pic.twitter.com/v3k6zuFWF1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 23, 2021