कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

काँग्रेसकडून आले स्पष्टीकरण

कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

काँग्रेसच्या आणखी एका नेत्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली आहे.कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ आणि त्यांचे पुत्र नकुल नाथ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत असताना काँग्रेस खासदार मनीष तिवारीही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.पंजाबमधील आनंदपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार तिवारी हे भाजपच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना यावेळी लुधियाना लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. यापूर्वी तिवारी यांनी केवळ लुधियाना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

हे ही वाचा:

आसाममधील अमृतपाल सिंगच्या कोठडीत स्पायकॅम पेन, फोन!

‘सीता’ सिंहीण आणि ‘अकबर’सिंहाच्या एकत्र राहण्यास विरोध!

गीतकार गुलजार आणि जगद् गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!

मात्र, मनीष तिवारी यांच्या कार्यालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मनीष तिवारी यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत याची माहिती दिली.निवेदनात म्हणाले की, मनीष तिवारी यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतच्या बातम्या ह्या सर्व खोट्या आहेत.मनीष तिवारी हे त्यांच्या मतदारसंघात असून ते तेथील विकासकामांवर देखरेख करत आहेत. काल रात्री त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केला, असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version